निवडणूक आयोगात विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका – संतोष गुट्टे
उदगीर (प्रतिनिधी) : महाविद्यालयीन विद्यार्थी हे निवडणूक प्रक्रियेमधील महत्त्वाचे घटक आहेत.त्यांनी स्वतःहून झोकून देऊन या प्रक्रियेमध्ये कार्य करावे. तरच निवडणूक प्रक्रिया सोपी होईल. निवडणूक आयोगात विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. असे मत नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी काढले. ते शिवाजी महाविद्यालय एन एस एस विभाग व तहसील कार्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वीप अंतर्गत नव मतदार जनजागृती कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरविंद नवले हे होते तर प्रमुख उपस्थिती उदगीरच्या नायब तहसीलदार राजश्री भोसले, पुरवठा निरीक्षण अधिकारी सुमित्रा इलमले, उपप्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे यांची होती. पुढे बोलताना गुट्टे म्हणाले, निवडणूक प्रक्रियेमध्ये तरुणांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने सहभागी व्हावे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नवले यांनी म्हटले,विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे यांनी केले तर आभार प्रा.बालाजी सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.