भटके विमुक्त समाज महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार – राहुल केंद्रे

0
भटके विमुक्त समाज महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार - राहुल केंद्रे

भटके विमुक्त समाज महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार - राहुल केंद्रे

उदगीर (एल. पी. उगिले) : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात राज्याच्या भटके विमुक्त आघाडीची प्रदेश कार्यकारणीची जंगी बैठक पार पडली. यात, महायुतीच्या सरकारने भटके विमुक्तांसाठी, राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यात आला. महायुतीचे सरकार समाज बांधवांसाठी वरदान ठरले असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वजण भक्कमपणे महायुतीसोबत राहतील, आणि पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार येईल असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केला आहे.
आज पर्यंतच्या इतिहासात, भटके विमुक्त लोकांना सर्वाधिक योजनांचा फायदा महायुतीच्या सरकारमध्येच झाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण, वसंतराव नाईक तांडा वसति सुधार योजना,यशवंराव चव्हाण मुक्त वसाहत आदी योजनेतून माझ्या भटके विमुक्त समाजाला मोठा फायदा झाला आहे. त्याचबरोबर, त्यांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी येत असलेल्या अडचणी महायुती सरकारने दूर केल्या असून यासाठी सरकारने विशेष मोहीम राबविली आहे. तळागाळातील भटक्या विमुक्तांच्या उद्धाराकरिता महायुतीचे सरकार कटीबद्ध आल्याचा संदेश सर्वदूर गेला असल्याने भटक्या विमुक्त समाजातील सुजाण मतदार, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देतील असा विश्वास, भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी, व्यासपीठावर माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवतराव कराड, भाजपा प्रदेश महामंत्री तथा भटके विमुक्त आघाडीचे प्रभारी संजय केनेकर, सर्व प्रदेश सरचिटणीस,
तसेच या बैठकीसाठी प्रदेश सरचिटणीस प्रमोद परदेशी, युवराज मोहिते,राजूदादा साळुंखे, संतोष आव्हाड, रवी शिंदे, संपतराव नागरे, प्रा बिभीषण पाळवदे, संजय मेंढे, शिवाजीराव आव्हाड, अशोकराव चोरमले यांच्यासह आघाडी युवक प्रदेश अध्यक्ष अमोल गायकवाड सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, विधानसभा संयोजक व सहसंयोजक उपस्थित होते. यांच्यासह आघाडीचे राज्यभरातील पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

चौकट
राहुल केंद्रे यांचे प्रदेश कार्यकारणी कडून कौतुक…

संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून समाज बांधवांना एकसंघ करण्याच्या कामी युवा नेते राहुल केंद्रे अग्रेसर राहिले आहेत. पक्ष संघटन बांधणीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. एक कर्मठ आणि ध्येयनिष्ठ नेता काय असतो? हे राहुल केंद्रे यांच्याकडे पाहिल्यानंतर जाणवायला लागते. असे गौरव उद्गार प्रदेश कार्यकारणी कडून काढण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *