दिवाळी फराळातून केली मतदार जनजागृती(गोड फदार्थ खा पण 20 नोव्हेंबर ला आवश्य मतदान करा स्वीप पथकाचे आवाहान)
अहमदपूर ( गोविंद काळे )
विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी अहमदपूर तालुक्यातील गावातून प्रबोधपर लोकगीतातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे.आपल्या गावातून ७५% पेक्षा जास्त मतदान होण्यासाठी स्वीप पथकाने दिवाळीत गोडधोड पदार्थापासून जनजागृती केले.
मतदार बंधू-भगिणींना मतदानाचे महत्त्व पटवून देवून,लोकशाहीतील महा उत्सवात सहभाग नोंदवावेत. आपण शासनाच्या सर्व सोई सुविधा हक्काने उपभोगत आहोत.संविधानाने आपणास दिलेला मतदानाचा हक्क येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी आपले कर्तव्य समजून पार पाडावे. देशाचे आदर्श भारतीय नागरीक होण्याचे कर्तव्य पार पाडून देशातील आदर्श नागरीक होण्यासाठी महाउत्सवात सहभाग नोंदवावेत.
सणांचा राजा म्हणून दिवाळी सणाकडे पाहिले जाते. छोट्यांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण सकारात्मक उर्जा घेवूण येणाऱ्या या सणाची वाट पाहत असतो. धनत्रयोदशीपासून या सणाला सुरुवात होते. त्यानंतर नरक चतुदर्शी, लक्ष्मी कुबेर पूजन, भाऊबीज आणि दीपावली पाडवा साजरा केला जातो. या आनंदोत्सवात नाती दिवसागणीक अधिक वृद्धींगत होत राहतात. चैत्यनाचा, आनंदाचा, उत्साहाचा, सकारात्मक उर्जेचा, मानवी हितसंबंध जपणारा सण म्हणून या सणाकडे पाहिले जाते.मुख्यत: म्हणजे या सणात पदार्थांची रेलचेल असेलेला फराळ केला जातो. वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतात.या फराळ पदार्थांचा वापरातून ही नाविन्यपूर्ण जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूरचे तहसीलदार उज्वला पांगरकर व चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे ,दिलीप हैबतपुरे यांच्या आदेशानुसार मतदारसंघात जनजागृती होत आहे.सर्व सुजान मदार बंधुंना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आवाहन करण्यात आले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे पथक,प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,बस्वेश्वर थोटे,नागनाथ स्वामी,अर्चना माने,विवेकानंद भंडे,नागनाथ मठपती,संभाजी यलपुरवाड,कपिल बिरादार,प्रा.शिवशंकर पाटील,जयप्रकाश हाराळे आदिनी गावोगावी जाऊन परिश्रम घेत आहेत.