दिनांक : 11 जुलै रोजी मोफत सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजन

दिनांक : 11 जुलै रोजी मोफत सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजन

उदगीर ( प्रतिनिधी ) : धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर आणि रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मापासून ते 16 वर्ष वयापर्यंतच्या लहान बालकांमध्ये शारीरिक,मानसिक व बौद्धिक विकासासाठी तथा कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपचार,त्वचेची कांती वाढविण्यासाठी,पचनशक्ती सुधारण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मोफत आयुर्वेदिक सुवर्णप्राशन(बाल रसायन घृतपान)-एक आयुर्वेदिक लसीकरण हे शिबिर धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,देगलूर रोड,उदगीर येथे पुष्य नक्षत्र दिवस,रविवार, दिनांक:-11 जुलै 2021 रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

सुवर्णप्राशनामुळे(सुवर्णभस्म,गाईचे औषधीयुक्त तूप आणि मध,ब्राह्मी चुर्ण,शंखपुष्पी,वचा,यष्टिमधु चूर्ण,गुडूची चुर्ण,इत्यादी)शरीरातील इम्यून सेल्स व टी सेल्स वाढतात,अन्य रोगांचे संक्रमण सुद्धा होत नाही व शरीरामध्ये कसलेही मेटाबोलिक बदल न होता त्याचा लहान मुलांच्या पोषणामध्ये लाभ होतो असे सेंटर फॉर बायोमेडिकल रिसर्चच्या वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे.

या शिबिराचे उद्घाटन उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामान्य रुग्णालय,उदगीरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार हे उपस्थित राहणार आहेत.

तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील,रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष रो.प्रमोद शेटकार,सचिव रो.रवि हसरगुंडे,प्रा.डाॅ.अस्मिता भद्रे,प्रोजेक्ट चेअरमन रो.डाॅ.महेश जाधव,रो.अन्नपूर्णा गुत्तेदार,प्रा.डाॅ.अवतारसिंग मिस्त्री,डाॅ.उषा काळे,प्रा.डाॅ.नारायण जाधव,प्रा.डाॅ.मंगेश मुंढे व संपूर्ण संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

About The Author