आमदार बाबासाहेब पाटील यांची शेतकरी आत्महत्या या विषयावर आधारित ‘फास’ या चित्रपटाच्या प्रदर्शन सोहळ्याला उपस्थिती

अहमदपूर (गोविंद काळे) : शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना आणि विठ्ठल राजे पवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, मुंबई येथे पत्रकार परिषद व ‘फास’ चित्रपटाच्या प्रदर्शन सोहळ्याला अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी सिनेअभिनेते सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘आत्महत्या हा उपाय नाही’ या विषयाला धरून शेतकरी आत्महत्येवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश कोलते यांनी तर कथा माहेश्वरी पाटील चाकूरकर यांनी लिहली आहे.