अहमदपूर- चाकूर मतदारसंघाच्या विकासासाठी बाबासाहेब पाटील यांना विजयी करा – जिल्हाप्रमुख गोपाळ माने
डोंगऱज येथे आयोजित जाहीर सभेत नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
चाकूर ( गोविंद काळे ) अहमदपूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांना प्रचंड मताधिकाने विजयी करावं व मतदारसंघाचा विकास पुन्हा त्याच जोमाने करून घ्यावा असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ माने यांनी डोंगरज येथे आयोजित जाहीर सभेत केले. सभेच्या अध्यक्षस्थानी अनुप देशपांडे हे होते.
याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य पद्माकर राव पाटील,शिवराजअण्णा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळभाऊ माने, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शनजी मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव काळे,जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर अप्पा अक्कानरू, संचालक यशवंतराव जाधव, माजी जि. प. सदस्य दयानंदरासा सुरवसे, बालाजी दादा सूर्यवंशी, सामजिक न्याय विभाग जि. कार्याध्यक्ष विष्णुकांत तिकटे, गणपत नितळे महाराज,निर्मला ताई वाडकर, गणपत आबा कवठे,मधुकर मुंढे,विजय मारापल्ले बापू कज्जेवाड, नगरसेवक पपन कांबळे, नगरसेवक प्रतिनिधी मोहम्मद सय्यद, नूते सर, सिद्धेश्वरअप्पा अंकलकोटे, डॉ. अब्दूल शेख,बळीराम भोसले, दिनकरराव केंद्रे गुरुजी, मेघराज पाटील, माजी प. समिती सदस्य सिद्धेश्वर शिंदे, संदीप शेटे, बालाजी पाटील, आय. डी. शेख, मनोज पाटील, विवेकानंद शिंदे, शशिकांत शिंदे, बिलाल पठाण, सिद्धेश्वर शिंदे, हरीश चव्हाण, प्रफुल्ल चवळे, गणेश पाटील, प्रा. एन. डी. राठोड, नारायण काचे, लक्ष्मणराव घुमे, गणेश स्वामी, सतीश पाटील, शैलेश वाडकर, बिलाल पठाण, चंद्रमनी सिरसाट, योगेश वाडकर, सचिन बदनाळे, संगमेश्वर वाडकर, लामतुरे गुरुजी, अरविंद पाटील, संचालक राहुल भैया सुरवसे, चेअरमन शेषेराव मुंजाने, भीमाशंकर पाटील, डी. के. कासले, पप्पू सावंत, सरफराज घोरवाडे, बालाजी माटे, गणेश सिंदाळकर विश्वनाथ एडके, ता. कार्याध्यक्ष निसार देशमुख, नाथा मद्रेवार, समाधान जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माने म्हणाले की सर्वसामान्यांसाठी विकास खेचून आणणार नेतृत्व म्हणून आमदार बाबासाहेब पाटील यांची ओळख असून जर आपण विरोधी पक्षाला सत्तेत आणला तर विकासापासून आपल्याला कोसू दूर जावं लागल यासाठी आपण आमदार बाबासाहेब पाटील यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करावे असे त्यांनी आवाहन केले.
अध्यात्माचा नेतृत्वाला उभारी द्या – सूळ महाराज
राजकारणाला अध्यात्माची जोड देऊन अध्यात्माला सुद्धा चांगल्या प्रवाहात आणणारे बाबासाहेब पाटील यांच्या पाठीशी सर्व जनतेने भक्कमपणे उभे राहून त्यांना पुन्हा एकदा आपण विधानसभेत पाठवावेत असे आवाहन हाळी हांडरगोळी येथील सूळ महाराज यांनी केले.
माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची संधी दिली – सुदर्शन मुंडे
आज विरोधी पक्षाचे नेते जातीपातीचे राजकारण आणून ही निवडणूक वेगळ्या दृष्टीने नेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु माझ्यासारख्या ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याला साहेबांनी जिल्हा परिषद मध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली साहेबांनी कधीच जात पात पहिली नाही यामुळे आपणही निवडणुकीत जात-पात न पाहता आमदार बाबासाहेब पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना विजयी करावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंडे यांनी केले.
अंतेश्वर प्रकल्पासाठी बाबासाहेबांना निवडून द्या : दयानंद सुरवसे
मतदार संघ पाणीदार व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार बाबासाहेब पाटील यांना अंतेश्वर चा महत्वकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण बाबासाहेब पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवावी व सर्व जातीधर्माला सोबत घेऊन काम करणाऱ्या नेतृत्वाला आपण विधानसभेत पाठवावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंद सुरवसे यांनी केले.
अहमदपूरच्या युवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
अहमदपूर येथील दस्तगीर बागवान यांच्या नेतृत्वात व आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अहमदपूर शहरातील रफिक बागवान, वाहिद बागवान, खदिल बागवान,आसिफ बागवान, राजीक बागवान, जावेद बागवान, इरफान बागवान, जमू शेख, आक्रम शेख, फिरोज बागवान, रिहान बागवान, आयुब बागवान, सदाम सय्यद, बद्रोदिन सय्यद, आदींनी प्रवेश केला.
यावेळी सरपंच केलवाड ललिता, परमेश्वर केंद्रे, लक्ष्मण घुमे, शिवाजी मुंडे, रफिक बागवान , मगदूम मणियार, भीमराव मुंडे, पप्पू मुंडे वहाब हाडोळतीकर, राम घुमे,माधव नरवाडे, राजाराम नरवाडे, सह आदी उपस्थित होते.