आमदार बाबासाहेब पाटील शेतकर्यांच्या बांधावर
लाडक्या बहिणींशी साधला संवाद
चाकूर ( गोविंद काळे ) चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना तिवटघाळ वरून निघाल्यानंतर देविदास होळदांडगे यांच्या शेतामध्ये अनेक लाडक्या बहिणी काम करत असताना आमदार बाबासाहेब पाटील यांनी बांधावर जाऊन मजुराशी संवाद साधला व महायुती सोबत राहण्याचे आवाहन केले व घड्याळाला मतदान करण्याची विनंती केली. महिलांनी ही आम्ही महायुतीच्या व घड्याळाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार असल्याचे सर्व महिलांनी सांगितले.
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या समवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ माने, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, वसंतराव डिगोळे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते…
