संजय गांधी निराधार समिती सदस्य पदी प्रकाश ससाणे यांची निवड

संजय गांधी निराधार समिती सदस्य पदी प्रकाश ससाणे यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संजय गांधी निराधार अनुदान समितीवर अनु.जाती विभागाचे तालुकाध्यक्ष  प्रकाश ससाणे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.जिल्हाचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या शिफारशीवरून ही त्यांची निवड करण्यात आली आहे.या त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत मद्दे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. हेमंत पाटील,अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सिराजोद्दीन जहागीरदार,दिलीप पाटील, शहराध्यक्ष विकास महाजन, शिवाजीराव जंगापल्ले,राजू पाटील,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अझहरभाई बागवान, सय्यद मुज्जमिल,सदाम पटेल,सदाम पठाण, आशिष तोगरे, ईलियास सय्यद,नगरसेवक रवी महाजन, जावेद बागवान,पिंटू सुर्यवंशी आदींनी अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!