चाकूर तालुक्यातील शेतकर्यांना त्वरित पीकविमा मंजूर व वाटप करा
मनसेचे तहसीलदार यांना निवेदन
चाकूर (गोविंद काळे) : चाकूर तालुक्यातील शेतकर्यांना त्वरित पीकविमा मंजूर व वाटप कराअश्या आशयाचे निवेदन मनसेच्या वतीने तहसीलदार, तहसील कार्यालय, चाकूर यांना देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गतवर्षी शेतकरी तिबार पेरणी, बोगस बियाणे, अतिवृष्टी अश्या संकटांमध्ये अडकूनही काही शुल्लक त्रुटींवर बोट ठेऊन शासन, पीकविमा कंपनी व कृषी विभागाने शेतकर्यांना पीकविमा मंजूर न केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण या पेरणीसाठी त्याला पीकविमा भेटलाच नाही तो त्वरित मंजूर करावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे यांच्याकडे मनसेचे चाकूर तालुकाध्यक्ष सूर्यकांत शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली केली.
शेतकरी सर्वात जास्त अडचणीत बोगस बियाणे न वापल्याने आला व त्याचा पेरणीच्या एकूण खर्च वाया गेला. परंतु त्याला बियाणे कंपन्यांकडून कुठलीही मदत तर भेटलीच नाही वरतून पीकविमा कंपन्यांनी तर शासनाचा बियाणे न वापलेला पंचनामाही गृहीत धरला नाही व शेतकर्यांना विमा मंजूर न करता वेगळाच पंचनामा बनवला. तरी त्वरित शेतकर्यांना वेड्यात न काढता पीकविमा मंजूर करावा अन्यथा मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशाराही दिला आहे. यावेळी सचिव राहुल आरदवाड, उपाध्यक्ष तुळशीदास माने, संभाजी बडगिरे, इरफान अत्तार, बाबुराव कोरे, नंदकिशोर सुडे, मारुती पाटील, विष्णू बोंबडे, बसवराज होनराव, सतीश जगदाळे आदी उपस्थित होते.