आता सोसवेना महागाईचा भार-भाजीपाला, पेट्रोल, डीझेल भाव वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटा कुटीला
अहमदपूर (गोविंद काळे) : आता सोसवेना महागाईचा भार. भाजीपाला, पेट्रोल, डीझेल भाववाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दररोज वापरातील भाजीपाला, किराणा माल, डिझेल, पेट्रोल चे भाव कोरोना महामारिच्या काळात गगनाला भिडले आहेत.कोरोना काळात कामधंद्याला खीळ बसलेल्या सर्व सामान्य जनतेला मात्र या भाववाढीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तर दुसरीकडे शेतकर्याच्या उत्पादनाला मार्केट कुठे चालू तर कुठे बंद असल्यामुळे कष्टाच्या तुलनेत भाव नसल्याने शेतकर्याची आर्थिक कोंडी झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या आहरातील भाजीपाला खाणे काटकसरीचे बनले आहे. भाजीपाल्याच्या दुकानावर एक किलोच्या पिशवीच्या भाजीपाल्यात आता पावकिलोची जागा मिळत आहे.बाजारात वांगे 80 ते 100 रु.,कारले 80ते 90रु., दोडके 70ते 80रु., लसुण 120 ते 140 रु., गवार 70 ते 80रु, हिरवी मिरची 70 ते 80रु, अद्रक 40रु,फ्लावर 50रु,भेंडी 40ते50रु.किलोचा भाव असल्याने सर्वसामान्य नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी विचार करून खरेदी करावा लागत आहे. तर दुसरीकडे पेट्रोल 107रु, तर डिझेल 98 रु च्या घरात भाव गेला आहे. डिझेल व पेट्रोलच्या भाववाढीची जणू काय स्पर्धाच लागली आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोरोना काळात कमाई पेक्षा खर्च जास्त होत असल्याने नागरिकांना व्याजी पैसा काढून उदरनिर्वाह भागवावा लागत आहे.या महामारिमुळे कामगाराना रोजगार हा मिळत नाहीत तेव्हा ते दिवस कसेबसे काढत आहेत.पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे मोटरसायकली मात्र शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.सध्या खर्चिक झालेले जीवनमान जगणे मुश्कील झाले आहे. आधुनिकतेच्या काळात जगाबरोबर चालण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागते आहे. नागरिकांना आता पेट्रोल, डिझेल, मोबाइल रीचार्ज या सर्व बाबीचा विचार करावा लागणार आहे व सर्व बरोबर पळावे लागणार आहे अन्यथा थांबला तो संपला.