धुमाळ यांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादीला बळ – चंदन पाटील नागराळकर
लातूर ( एल. पी. उगिले ) : लातूर जिल्ह्यातील एक धुरंदर नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, ते पंडितराव धुमाळ साहेब आता तरुणांची शक्ती ठरणार आहेत. युवा पिढीला योग्य मार्गदर्शन आणि राजकीय कामकाजाची दिशा ते देतील आणि राष्ट्रवादीची ताकद निश्चितपणे जिल्ह्यात वाढेल. अशी अपेक्षा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन भैय्या पाटील नागराळकर यांनी व्यक्त केली आहे.
पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देशाचे नेते शरद पवार साहेब यांनी सतत बेरजेच्या राजकारणाची शिकवण दिली. तीच शिकवण प्रत्यक्ष कृतीत उतरवत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष सुरज भैय्या चव्हाण यांच्या पुढाकारातून पंडितराव धुमाळ साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील, राज्यमंत्री ना. संजयजी बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा पक्ष प्रवेश संपन्न झालेला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, शिवाजिराव गर्जे, राष्ट्रीय अल्पसंख्यांक अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सुरज भैय्या चव्हाण ,राष्ट्रवादीचे लातूर जिल्हा माजी अध्यक्ष डी. एन. शेळके इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पंडितराव धुमाळ यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे.
सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून कार्य करणारे नेतृत्व जेव्हा पक्षामध्ये प्रवेश करते, तेव्हा निश्चितपणे राजकीय फायदा होतो. जिल्ह्यातील राजकीय संस्कृती कशी सांभाळावि? हे पंडितराव धुमाळ यांच्याकडून शिकता येऊ शकेल. लातूर जिल्ह्यातील निलंगा विधानसभा मतदारसंघात तुलनात्मक दृष्टीने राष्ट्रवादीची शक्ती कमी हौती, आता धुमाळ यांच्या पक्ष प्रवेशा मुळे निश्चितपणे निलंगा मध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास ना. जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना पक्षात घेणे सोपे आहे, परंतु पक्षात घेतल्यानंतर त्यांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे. त्या दिशेने कार्य होणे गरजेचे आहे. असेही ना. जयंत पाटील यांनी सांगितले. पक्षप्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत ना. संजय बनसोडे यांनी केले.
येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातून बुथ कमिटी रचनेवर विशेष लक्ष दिले तर पक्षाला निश्चितपणे चांगले यश मिळू शकते. असा विश्वासही ना. संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी प्रविण सुरवसे, अतुल पाटील, फारुख देशमुख, अनिल कुमार देवंग्रे, वैभव म्हेत्रे, बालाजी लवे, सचिन दोडके, युसुफ मेहबूबसाब सय्यद, गुणवंतराव जाधव, संजय सावकार, बालाजीराव पाटील, सुधीर धुमाळ, विशाल धुमाळ, बळीराम माने, लतीफ पटेल इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. ही गोष्ट राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीने अत्यंत चांगली आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने शुभसंकेत आहे.त असे विचार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन भैय्या पाटील नागराळकर यांनी व्यक्त केले.