संविधान दिनाचा अमृत महोत्सवी वर्ष यशवंत विद्यालयात विविध उपक्रमातून साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय संविधानाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधानाच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यशवंत विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो.असंख्य भाषा,जाती,पंथ,धर्म असणाऱ्या वैविध्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता,न्याय,समता आणि बंधूता या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे असे भारतीय संविधान आहे.संविधान दिनाचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनजागृती व्हावी या उद्देशाने यशवंत विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय परिपाठात संविधानातील उद्देश पत्रिकेचे सामुहीक वाचन करुन घेण्यात आले.
भारतीय संविधानाचा स्वीकार ज्या दिवशी केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ होय. दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून पण ओळखला जातो. १९४९ मध्ये यादिवशी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला. २६ जानेवारी १९५० पासून संविधान देशात लागू झाले. १९ नोव्हेंबर, २०१५ रोजी केंद्रीय सामाजिक आणि सशक्तीकरण मंत्रालयाने २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.या दिनाचे औचित्याने विद्यार्थ्यांना संविधानातील हक्क व कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.संविधानावर आधारीत गीत ऐकविण्यात आले.घटनेचे शिल्पकार डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन भारताचे संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.घटनेचे शिल्पकार डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजृन करुन घटना लिहिण्यासाठी आंबेडकर साहेबांनी दिलेले योगदान याबाबत विद्यार्थ्यांना सहशिक्षक लक्ष्मण फड यांनी माहिती दिली.द्वितीय सत्रात सांस्कृतिक प्रमुख कपिल बिरादार यांनी संविधानाचे महत्त्व पटवून दिले.
संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक सांगवीकर,सचिव शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी,सह सचिव डॉ.सुनिता चवळे,मुख्याध्यापक गजानन शिंदे,उपमुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे,शिवाजी सूर्यवंशी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिनी शुभेच्छा दिल्या.