शिवाजी महाविद्यालयामध्ये कै.अशोकराव पाटील एकंबेकर यांचा स्मृतिदिन साजरा
उदगीर (प्रतिनिधी) : शिवाजी महाविद्यालयामध्ये कै. अशोकराव बापूसाहेब पाटील एकंबेकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कै.अशोकराव पाटील यांच्या कार्याचे स्मरण करत असताना प्राचार्य डॉ.मांजरे म्हणाले, त्यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आपली उभी हयात संस्थेसाठी खर्ची घातली. त्यांचे शिक्षणावर अपार प्रेम होते. मुला मुलींच्या बौद्धिक,सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयोगशील शिक्षणाचा कायम आग्रह धरला. यावेळी डॉ.एस. एम कोनाळे, डॉ.व्हि.डी गायकवाड,डॉ.व्ही.के. भालेराव,डॉ.एस.व्ही.चाटे, व्ही.डी. गुरनाळे,आर.एम. लाडके, कमलाकर जगताप, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जयंती समिती प्रमुख प्रोफेसर डॉ.सुरेश शिंदे यांनी केले.