अण्णा भाऊ साठे यांच्यावर अन्याय करणाऱ्या पुणे शिक्षण मंडळावर शासन व्हावे.

अण्णा भाऊ साठे यांच्यावर अन्याय करणाऱ्या पुणे शिक्षण मंडळावर शासन व्हावे.

वादळ संस्थापक  प्रा शिवाजीराव दादा देवनाळे यांची मागणी.

पुणे ( रफिक शेख ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व् उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या तर्फे प्रत्येक महिन्याला शिक्षण संक्रमन निघते. मंडळाने जुलै २०२१  या महिन्याचे मासिक काढले. ४ जुलै  २०२१ ला स्वामी विवेकानंद यांचा स्मृती दिन, १८ जुलैला महान साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांचा स्मृतीदिन तर २३ जुलैला लोकमान्य  टिळक याची जयंती. शासन नियमांनुसार या तीनही  महामानवाचे फोटो मासिकात टाकून त्यांना वंदन करणे पुणे शिक्षण मंडळाचे आणि सचिवाचे नैतिक कर्तव्य असताना  जातीयवादी मंडळाने जनिवपुर्वक मासिकातुन महान साहित्यिक साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांना डावलले. हि घटना महाराष्ट्रातील मातंग समाजासह बहुजन समाजात तीव्र संताप निर्माण करणारी आहे.

अशा  जातीयवादी  मंडळाचा आणि मंडळ सचीवाचा जाहीर निषेध वादळ संघटनेचे प्रमुख प्रा. शिवाजीराव दादा देवनाळे यांच्या तर्फे करण्यात आला.

    अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य मराठी भाषेला राजवैभव मिळवून देणारे आहे. महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यात ५ वी ते पी एच डी पर्यंतच्या शिक्षणात अण्णा भाऊच्या साहित्याचा समावेश आहे. आज देशभरात त्यांच्या सहित्यावर पी एच डी, एम फील,  करत हजारो विद्यार्थी संशोधन करीत आहेत.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत  आणा भाऊचे अनमोल योगदान आहे. छ. शिवाजी महाराज यांचा पोवाडा रशियात गाऊन मराठी अस्थित्वाचा झेंडा सात समुद्रापार घेऊन जाणार्‍या  अण्णा भाऊ साठे यांचा मंडळाला गौरव असावयास हवा. पण  पुणे शिक्षण मंडळाने अण्णा भाऊ साठे यांचा फोटो न टाकून अण्णा भाऊ साठे यांच्यावर  कोणत्या कारणाने अन्याय केला? याचे उत्तर मंडळ सचीवाने द्यावे.  अण्णा भाऊ साठे देशाची अस्मिता आहे. यांचा मंडळाला इतक्या लवकर  विसर कसा ?   असा प्रश्न महाराष्ट्र भर चर्चिला जातोय. हि घटना फुले,शाहू,आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला अशोभनिय असून ज्यांनी ज्यांनी ह्या गंभीर चुका केल्यात त्यावर योग्य ते शासन व्हावे. या बाबदचे निवेदन शासन दरबारी देण्यात आले.

सदर निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत,शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठविण्यात आले.या निवेदनावर  रूपेंद्र  चव्हाण, बालाजी कांबळे,बालाजी कसबे,सुरज चौधरी,प्रा. रामभाऊ हंडरगुळीकर,ऍड हणमंत मुंडे, बापूसाहेब कांबळे,संजीव काळे,मिलिंद कांबळे, भीमराव गायकवाड,गोरिले अनंत,मिलिंद कांबळे,शिवाजी मोरे, अदिच्या त्यावर सह्या आहेत.

About The Author