हालकी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम
हालकी (संदीपान पारगावे ) : आज हालकी ता. शिरूर अनंतपाळ येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दीना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.. हालकी गावचे सरपंच सौ. कांताबाई सूर्यवंशी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचे पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमांची सुरवात केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि शेवटी त्रिशरण पंचशील घेऊन बौद्धाचार्य सचिन गंडले यांनी कार्यक्रमांची सांगता केली.शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन चे पोलीस कैलास शिंदे,संदीप पारगावे, नरसिंग बेवनाळे, विश्वम्भर सूर्यवंशी, विश्वजीत सूर्यवंशी, माधव कांबळे, विजयकुमार गायकवाड, मिलिंद सूर्यवंशी,बालाजी सूर्यवंशी, मदन सूर्यवंशी, अलका कांबळे, मयुरी तरपे,बालाजी कांबळे, भगवान सूर्यवंशी, राहुल सूर्यवंशी, गजेंद्र कांबळे, गणपती सूर्यवंशी, ज्ञानोबा सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, मनोज सूर्यवंशी, नामदेव सूर्यवंशी, बंडू सूर्यवंशी, प्रल्हाद कांबळे.. आदी समाज बांधव व गावकरी उपस्थित होते.