सर्वांना सोबत घेऊन विकासाकडे झेप घेणारे नेतृत्व आमदार बाबासाहेब पाटील – राजकुमार सोमवंशी

0
सर्वांना सोबत घेऊन विकासाकडे झेप घेणारे नेतृत्व आमदार बाबासाहेब पाटील - राजकुमार सोमवंशी

अहमदपूर ( गोविंद काळे ) : मतदारसंघात आतापर्यंतच्या निवडणुकांत सलग दुसऱ्यांदा विजयी होण्याचा विक्रम बाबासाहेब पाटील यांच्या नावावर झाला आहे. त्यांनी मतदारसंघातील सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण केले. यामुळेच त्यांना सलग दुसऱ्यांदा विजयी होता आले. राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या मदतीने त्यांनी मागील अवघ्या पाच वर्षांत तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचा विकासनिधी खेचून आणला.

त्यातून शिरुर ताजबंद, किनगाव, नळेगाव, चाकूर या बसस्थानकांची दुरुस्ती व सुशोभिकरण केले, कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रुपांतर केले, गावांच्या विकासासाठी दळणवळणासाठी रस्ते मजबूत केले, गावअंतर्गत रस्ते तयार केले, विविध गावांमध्ये सांस्कृतिक सभागृह, ईदगाह मैदानांसाठी सरंक्षण भिंती, शादीखाने अशी शेकडो कोटींची कामे केली. विकासकामे करताना त्या गावच्या नागरिकांनी मतदान केले का नाही, हे कधीच पाहिले नाही. गावांच्या गरजा ओळखून निधी देण्याला प्राधान्य दिले.

जनतेशी असलेली नाळ कायम राहावी, यासाठी माजी मंत्री बाळासाहेब जाधव, निवृत्त कार्यकारी अभियंता तथा माजी सरपंच साहेबराव जाधव, सिध्दी शुगरचे संचालक अविनाश जाधव, मुलगा सूरज पाटील, पुतण्या युवराज पाटील यांनी नागरिकांशी संपर्क ठेवला. आलेल्यांची कामे केली.
सतत चार वर्षे अकरा महिने तीस दिवस हे जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून सुख, दुःखात धाऊन जाऊन आधार देण्याचे काम केले. अहमदपूर-चाकूर तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून ट्रामा केअर सेंटर अहमदपूर, चाकूर इलेव्हन ३३ केव्ही केंद्र, एमएसईबी ट्रामाकेअर सेंटरची मान्यता मिळवून घेतली. आवश्यक मशिनरी, कर्मचारी व औषधी उपलब्ध करुन देण्याचे काम केले. किनगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी घेतली. जिल्ह्याचे अहमदपूर तालुक्याचे शेवटचे गाव असलेले खंडाळी गावातील उपकेंद्राचे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुपातंर हे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आमदार बाबासाहेब पाटील आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने त्यांना निरोगी आरोग्य व उदंड आयुष्य लाभो.

अहमदपूर-चाकूर तालुक्यातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून निवडणुकीत दिलेले अंतेश्वर बंधाऱ्याचे पाणी दोन्ही तालुक्यांतील गावात आणून शेतकऱ्यांच्या शेतीला बारमाही पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सध्या युवकांचे सुशक्षित बेकारीचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्या हाताला काम देण्यासाठी नवनवीन उद्योगधंदे उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागातील गरीब मुलांना एमपीएस्सी तयारी करण्यासाठी शहरात जाऊन राहण्यासारखी परिस्थिती नसल्याने गावांतच ग्रंथालयांत पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी राजकुमार सोमवंशी यांना सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *