लातूर जिल्हयातील चोरी गेलेल्या नऊ मोटार सायकल सह तीन अल्पवयीन मुले ताब्यात ; गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी
अहमदपूर( गोविंद काळे ) पोलीस स्टेशन अहमदपूर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने लातुर जिल्ह्यातील चोरी गेलेल्या नऊ मोटार सायकल सह तीन विधीसंघर्षे ग्रस्त ( अल्पवयीन ) बालक ताब्यात घेण्यात आले असुन त्यांच्याकडून वेगवेगळया कंपनीच्या एकुण 9 मोटार सायकल अंदाजे 5 लाख रुपये किंमतीच्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
तालुक्यासह लातुर जिल्ह्यात मागील काही महीन्यापासुन मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असुन जिल्ह्याभरातील विविध पोलीस स्टेशन येथे मोटार सायकल चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते अहमदपूर पोलीस स्टेशन येथे देखील अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या या चोरीच्या मागे एखादी टोळी सक्रिय असावी असा पोलीसांचा संशय होता त्या अनुशंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस अधिक्षक चंद्रकांत रेडडी , उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर , पोलीस स्टेशन अहमदपूर येथील पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस स्टेशन अहमदपूर येथील पोलीस अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने सदर पथकाने माहितीचे संकलन करीत असताना, असताना दिनांक 02/12/2024 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुप्त माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन अहमदपूर येथे दाखल गुन्हयात चोरी करण्यात आलेली लाल रंगाची युनीकॉर्न मोटार सायकल ही मौजे ब्रम्हवाडी ता अहमदपूर येथे विकण्यासाठी तीन विधीसंघर्षे ग्रस्त ( अल्पवयीन ) बालक आलेले आहेत. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने दिनांक 02/12/2024 रोजी सदर पथक तात्काळ ब्रम्हवाडी ता अहमदपूर येथील रोडवर लाल रंगाच्या युनिकॉर्न मोटार सायकलसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ते तिघेजन विधीसंघर्षग्रस्त (अल्पवयीन ) बालक असल्याचे समजले. सदर विधीसघर्ष बालकास ताब्यातील मोटार सायकलचे चेसीनबर व इंजीन नंबर वरून अभिलेखाची पाहणी केले असता. सदर मोटार सायकल पोलीस स्टेशन अहमदपूर येथून चोरी केल्याचे आढळून आले त्यानंतर त्याचेकडे अधिक विचारपूस केली असता त्यांचेकडून वेगवेगळया कंपनीच्या एकुण 9 मोटार सायकल ज्याची एकूण किंमत अंदाजे 5 लाख रुपयांच्या मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
तिन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना पोलीस ठाणे अहमदपूर येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले असून सहा. फौजदार चिमनदरे हे पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन अहमदपूर येथील पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनुर यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोह/1443 तानाजी आरदवाड, पोकॉ/1460 कज्जेवाड, पोकॉ/1744 कांबळवाड, पोकॉ/553 पुठेवाड यांनी पार पाडली आहे.
चौकट : –
चोरांकडून हस्तगट केलेल्या मोटार सायकल व गुन्हा नोंद खालील प्रमाणे
गुरनं नं 326/24 कलम 379 IPC डिस्कव्हर मोटार सायकल नंबर MH-24X1719,गुरन नं 610/24 भा.न्या. स.क.303 (2) HF-डिलक्स मो. सा.नं MH-24BA0620,गुरन नं 684/24 भा.न्या.स. क.303 (2) यामाहा एमटी १५ मो.सा.नं MH-12UK3750, गुरनं नं 689/24 भा.न्या.स. क.303 (2) फॅशन प्लस मो.सा.नं MH-12EL 9425 , गुरन नं 675/24 भा.न्या.स. क.303 (2) युनिकॉर्न मो. सा.नं MH-24 AN 7262 , सदरील पाच मोटार सायकल चोरीचे गुन्हे अहमदपूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आले होते तर गुरनं 251/24 भा.न्या.स. क.303 (2) हिरो कंपनी मो.सा. नं MH-24BY5348 मोटार सायकल चोरीचा गुन्हा जळकोट पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता उर्वरीत तीन मोटार सायकलचे नंबर नसल्यामुळे कोठे गुन्हे दाखल झाले आहेत हे पोलीसांना समजु शकले नाही