अहमदपुरात तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध
अहमदपूर (गोविंद काळे) : मागील अनेक दिवसांपासून बांग्लादेशात हिंदूवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत असून, तेथील हिंदू धर्मस्थळे, माता- भगिनी, छोट्या बालिकांवरील अत्याचार, मंदिरे, बुद्ध विहार, गुरुद्वारे यावर होणारे हल्ले आणि संतांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात दि. १० डिसेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व भारतीय नागरिक व सर्व हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बांगलादेशच्या झेंड्याचे दहन करून, तीव्र निषेध व्यक्त केला.
व त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
सकल हिंदुस्थानातील भारतीय नागरिकांना बांगलादेशात होत असलेले अत्याचार व बलात्कारामुळे मानवी हक्क हिरावून घेत असल्याची भावना उत्पन्न झाली आहे. यामुळे तेथील हिंदूवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही अहमदपूर शहर व परिसरातील सर्व भारतीय या आंदोलनामार्फत तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. तरी आंतरराष्ट्रीय वाद संपवून तेथील हिंदूंना जगण्याचा अधिकार देण्यात यावा तसेच सदरचे निवेदन हे आपल्या वरिष्ठास पाठवून त्वरित बांगलादेशीय हिंदूवर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी पावले उचलावीत, असे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर अॅड. स्वप्निल व्हत्ते, मधुकर धडे, पांडुरंग लोकरे, संजीव मुसळे, ज्ञानेश्वर कोडगिरे, अमर पाटील, बालासाहेब गुट्टे, किरण भालके, नरेश यादव, ज्ञानोबा भताने, बाळासाहेब शेळके, रोकडोबा भुसाळे, शैलेश ठाकूर, महादेव चिरमुळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.