दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : लोकतेने दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंती निमित्त सामूहिक अभिवादन करण्यात आले. सूरूवातीला पंचायत समितीचे माजी सभापती अशोकराव केंद्रे आणि माजी नगरसेवक संतोष शेफ यांच्या हस्ते गोपीनाथराव मूंडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तस सम्याट मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते चौकाच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्या नंतर सामूहिक पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक संतोष शेप,माजी सभापती अशोकराव केंद्रे,संतोषभाऊ शेप,माजी उपसभापती बालाजी गुट्टे,बाजार समितीचे संचालक यशवंत केंद्रे, हरिराम गुट्टे, एकनाथ कराड, सचिन केंद्रे, प्रल्हाद इप्पर, सरपंच शरद मुंढे,सुधीर गुट्टे,वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश मुंढे,सचिन बानाटे,आकाश पवार आदींची उपस्थिती होती.