उदगीर शहरात बांगलादेशातील हिंदू वरील अन्यायाविरोधात मानवी साखळी आंदोलनाने निषेध
उदगीर (प्रतिनिधी) : बांगला देशातील हिंदू समाजावर होत असलेले हल्ले व इस्कॉनचे धार्मिक नेते चिन्मय कृष्णदास यांनी बांगला देशातील हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी केलेल्या आवहानामुळे बांगलादेशाने त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. न्यायालयातून सुध्दा त्यांना जामीन मिळला नसून त्यांच्यासाठी केस लढणाऱ्या वकीलावरही जवीघेणे हल्ला करण्यात आला आहे.यामुळे तेथील परिस्थिती खूप बिकट असून बांगलादेशाच्या सरकारने चिन्मय कृष्णदास यांना सध्या कोठे ठेवले आहे? व ते कोणत्या परिस्थितीत आहेत ? याचीही माहिती सरकार देत नाही.आरक्षणाच्या नावाखाली बांगला देशात सुरु झालेल्या हिंसाचारामध्ये थेट हिंदू, दलित, जैन, शिख आदी धर्मावर हल्ले होत असून महिलांचे अपरहरण, बलात्कार,कत्तली केल्या जात आहेत. मंदिरे उद्ववस्त होत आहेत.पूर्णपणे षडयंत्र करून इस्लामीक राष्ट्र बवण्याची तयारी आहे. तेथील हिंदू समाज भयभीत झाला आहे. त्यांना वाचवण्यसाठी व बांगलादेशावर दबाव आणावे यासाठी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले होते . या आंदोलनात उदगीर तालुक्यातील सर्व राज्यकीय पक्षाचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक संघटना,मठ, मंदिरातील पुजारी, संत, महंत, ट्रस्टी, ला . ब . शा . प्रा . चे मुख्याध्यपक, शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी छ . शाहू महाराज चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत मानवी साखळी आंदोलनात विविध घोषणा देत राज्य व केंद्र सरकारचे हात बळकट करून बांगलादेशातील हिंदूना न्याय देण्यासाठी व चिन्मय कृष्णदास यांना जेलमधून बाहेर काढून त्यांना सुरक्षा देण्यास भाग पाडावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार यांच्या वतीने निवेदन देण्यात आले . या साखळी आंदोलनाचे प्रमुख विश्व हिंदू परिषदेचे शहर अध्यक्ष महादेव घोणे, संतोष कुलकर्णी, सहमंत्री श्रीपाद करंजीकर , सह मंत्री आनंद महामुणी, उध्दव महराज,सतिश पाटील, प्रशांत ममदापूरे, अभिजीत पाटील, बाळासाहेब बिरादार, रोहित बोईनवाड, अनिकेत कोळी, रमेश सदानंदे, बुर्ले आनंद, सिद्धु अभंगे, रामेश्वर चांडेश्वरे हे प्रमुख उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती साईनाथ चिमेगावे, शंकरलिंग मठाचे मठाधिश सुखदेव महाराज, विश्वकल्याण यतीन्द्र आश्रम विश्वसेवा विश्वकल्याण आश्रम बालाजी महाराज जकनाळ, पतंजलीचे सुरेंद्र अक्कनगिरे, माजी नगराधाक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, शहराध्यक्ष मनोज पुदाले, तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, माजी जि.प . अध्यक्ष राहूत केंद्रे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, वसंत शिरसे, जिल्हाध्यक्षा उत्तराताई कलबुर्गे, तालुकाधक्षा उषा माने, विधानसभा प्रमुख तथा ग्रा. प. सोमथपूर सदस्या शिवकर्णा अंधारे, बबिता पांढरे,अरुणा चिमेगांवे, मनसे लातूर जिल्हाध्यक्ष संजय राठोड, मनोहर भंडे,सचिन साबणे, बंडेप्पा स्वामी, विश्वनाथ गायकवाड, आनंद बुंदे, ॲड . दत्ताजी पाटील, सावन पस्तापूरे,रामेश्वर पवार, पंडित सुर्यवंशी, कल्लप्पा स्वामी, पप्पू गायकवाड, डॉ. चंद्रकांत कोठारे, मोतीलाल डोईजोडे, यलमटे मामा, राम जाधव आदी शेकडोच्या संख्याने हिंदु प्रेमी उपस्थित होते.