शिवाजी महाविद्यालयाची कु.तेलंगे पल्लवी राजकुमार हिची विद्यापीठ योगा संघात निवड
उदगीर (प्रतिनिधी) : कलिंगा इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रीयल टेकनॉलॉजी (किट) भुवनेश्वर (ओढिशा) येथे आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ योगासन (महिला) स्पर्धेसाठी येथील शिवाजी महाविद्यालय उदगीरच्या कु.तेलंगे पल्लवी राजकुमार (एम.कॉम. व्दितीय वर्ष) हिची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या योगासन संघात उत्कृष्ट कौशल्याच्या आधारावर संघात निवड झाली आहे.
खेळाडूच्या या यशाबद्दल खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहित करणारे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव पांडुरंग शिंदे, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, व इतर कार्यकारिणी सदस्य, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.जी.जी. सूर्यवंशी, शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
खेळाडूला कीडा विभाग प्रमुख प्रा. नेहाल अहेमद, प्रा.गजानन माने यांनी तंत्रशुध्द पद्धतीचे मार्गदर्शन केले.