विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्याम कला पंधरवडा

0
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्याम कला पंधरवडा

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्याम कला पंधरवडा

चाकूर (एल.पी.उगीले) : शिवाजी विद्यालय,रोहिणा येथे श्यामलाल विज्ञान,कला व क्रीडा अकॅडमी तर्फे आयोजित “श्याम कला पंधरवडा” ची सुरुवात करण्यात आली.श्यामलाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट सुपोषपाणि आर्य यांच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी दिनांक 9 ते 14 डिसेंबर 2024 कला पंधरवडा आयोजित केला आहे.त्याची सुरुवात शिवाजी विद्यालय रोहिना या विद्यालयातील पालक सौ.मेघाताई फुलारी यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली.
या काळात विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन,कथाकथन,चित्रकला,अभिनय,फॅन्सी ड्रेस,विज्ञान प्रदर्शन,गणिती गमती व विनोद अशा अनेक कला प्रकारातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आनंददायी पंधरवडा सादर करण्यात येणार आहे.
संस्था अध्यक्ष यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवनवीन संधी व पूर्ण विद्यार्थी विकासासाठी हा शैक्षणिक उपक्रम राबवावा आणि उत्तम सुजाण नागरिक निर्माण करावेत असा आशावाद अध्यक्षांनी व्यक्त केला.या विद्यार्थ्यांसाठी संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व सरपंच व पोलीस पाटील, समस्त ग्रामस्थांनी या विद्यार्थी विकासाचा शालेय कामास शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *