उदगीरात पत्रकारांची आरोग्य तपासणी
उदगीर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर उदगीर येथे घेण्यात आले. मराठी पत्रकार परिषद ,मुंबई शाखा उदगीर ,इंडीयन मेडीकल असोशिएशन यांचे संयुक्त विद्यमाने मातभुमी महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले . यावेळी पत्रकार व कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उपविभागीय आधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन करण्यात आले.
तसिलदार राम बोरगावकर, इंडीयन मेडीकल असोशियएनचे अध्यक्ष डाॅ. बाळासाहेब पाटील ,सचिव डाॅ.महेश जाधव ,कोषाध्यक्ष डाॅ. संगमेश्वर दाचावार ,डाॅ. अनुप चिकमुर्गे ,डाॅ.संगमेश्वर सिद्धेश्वरे ,स्वाती पाटील , डाॅ. ज्योती सोमवंशी, डाॅ.प्रशांत नवटक्के , सतिश उस्तुरे , व्हि.एम.कुलकर्णी ,युवराज धोतरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे यांनी केले. सुत्रसंचलन विक्रम हलकीकर आभार प्रा. बिभीषन मद्देवाड यांनी केले. याप्रसंगी सिद्धार्थ सुर्यवंशी , रविंद्र हसरगुंडे ,सुनिल हवा ,रामबिलास नावंदर , महादेव घोणे ,संदिप निडवदे , श्रावण माने ,श्रीपाद सिमंतकर ,महेश मठपती ,विश्वनाथ गायकवाड, निवृती जवळे, बालाजी टाळीकोटे, आशोक तोंडारे, बाबासाहेब मादळे आदी पत्रकार उपस्थित होते.