डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे आंरभ बंधुत्व गण चॅरिटेबल ट्रस्ट, उदगीर व संजीवनी ब्लड बँक लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त दान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदानकर्त्यांनी, बौद्ध उपासक, उपासिकांनी ऊत्साहपुर्वक प्रतिसाद देत ३१ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी संस्थेचे सचिव अविनाश गायकवाड,भदंत नागसेन बोधीजी,बँकेचे किरण कांबळे, विनोद सुतार, चंद्रकांत कांबळे,शंकर शिंदे,करण भालेराव, विनोद कोल्हे, संजय सोनकांबळे, पिंपरे प्रविण, दिनेश मटके, बाबासाहेब कांबळे, प्रणव कांबळे इत्यादी सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले .