डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी उच्चशिक्षणाद्वारे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व मानवी मूल्ये निर्माण केले – प्राचार्या उषा कुलकर्णी
उदगीर (प्रतिनिधी) : सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षण हेच एकमेव औषध आसुन उच्चशिक्षणाद्वारे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मानवी मूल्ये स्विकारलेला एक स्वाभिमानी आधुनिक समाज निर्माण होत असतो. खर्या अर्थाने बासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा हाच खरा मूलाधार होता. असे मत प्राचार्य उषा कुलकर्णी यांनी व्यक्त केले त्या मातृभूमी महाविद्यालयात, मातृभूमी नर्सिंग स्कूल व कस्तुराबाई नर्सिंग स्कूल येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनामित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य उषा कुलकर्णी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण करत बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन केले.यावेळी रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा बिभीषण मद्देवाड, प्रा. रणजित मोरे, प्रा. उस्ताद सय्यद ,यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना प्राचार्या कुलकर्णी म्हणाल्या, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे मागासवर्गीय व महिला शिक्षणा संदर्भात जे चिंतन होते ते तितकेच मूलगामी स्वरूपाचे आहे. ज्ञानाअभावी व्यक्ती आणि समाजाचे नुकसान होते. एखादी व्यक्ती वा समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याच्या क्षमता मारून टाकणे अशी पूर्वी परिस्थिती होती. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला संविधान मिळाले. उपेक्षित आणि महिलांना न्याय मिळाला. असेही सांगितले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थीनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले. सुत्रसंचलन अनुष्का श्रीमंगले यांनी केले,तर आभार धरती पाटील यांनी मानले.