शिरूर- मुखेड महामार्गावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघातात एक जागीच ठार, दोन जण गंभीर जखमी
हडोळती (गोविंद काळे) : शिरूर मुखेड महामार्गावर दोन दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
हडोळती येथे गावाशेजारी भगीरथी मंगल कार्यालया जवळ शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली जयराम सायबु कानगुलकर रा . चांडोळा ता. मुखेड (वय 35)असे मृताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की चांडोळा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील तरुण जयराम सायबु कानगुलकर हे शुक्रवारी मुखेड कडून लातुर कडे सांय ६ च्या दरम्यान mh 26 cb 4357 दुचाकी वरून जात होते सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शिरूर- मुखेड महामार्गावरील हडोळती गावाजवळ आले असता त्यांना शिरूर ता. कडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH24- BQ-6028 च्या चालकाने जयराम कानगुलकर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत ते जागीच ठार झाले या घटनेची माहीती कळताच अपघात स्थळी मोठी गर्दी जमली होती पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने धडकेत भरधाव वेगातील दुचाकीवरील जखमी पती, पत्नी पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मृत व्यक्तीच्या शवविच्छेदन करण्यासाठी हडोळती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले शनिवारी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे या घटनेने कानगुलकर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या अपघाताप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजले.