शेतीच्या वादातुन विषारी औषध पाजुन जिवे मारण्याचा प्रयत्न ; महीलेची मुला विरूद्ध पोलीसात तक्रार

0
शेतीच्या वादातुन विषारी औषध पाजुन जिवे मारण्याचा प्रयत्न ; महीलेची मुला विरूद्ध पोलीसात तक्रार

शेतीच्या वादातुन विषारी औषध पाजुन जिवे मारण्याचा प्रयत्न ; महीलेची मुला विरूद्ध पोलीसात तक्रार

बळजबरीने विषारी औषध पाजून धक्का बुक्की व जीवे मारण्याची धमकी ; महीलेची पोलीसात तक्रार

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील थोरलेवाडी येथील केवळबाई पांडूरंग फुलमंटे या महीलेला स्वताच्या मुलानेच गणपत पांडुरंग फुलमंटे याने शेतीच्या व विहीरीच्या वादातुन धक्काबुक्की करून बळजबरीने विषारी औषध पाजवुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार पिडीत महीलेने उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर यांच्याकडे अर्जाद्वारे दिली आहे

याविषयी सविस्तर माहीती अशी की,केवळबाई पांडुरंग फुलमंटे रा. थोरलेवाडी ता. अहमदपूर या महिलेला तिच्या स्वताच्याच मुलाने शेतीच्या व विहरीच्या वादातुन विषारी औषध पाजवुन धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे असा तक्रार अर्ज पोलीसात दिला आहे यात पिडीत महीलेने म्हटले आहे की, माझे पती पांडुरंग फुलमंटे मृत्यु पावले असून मला दोन मुले नामे गणपत व नवनाथ व एक मुलगी नामे सावित्रा नागेश मलवाडे असून आम्ही सर्वजन वेगळे राहतोत व माझ्या नावे दोन एकर जमीन असून त्यात विहीर आहे व ती विहीर स्वतंत्र माझी आहे.

मी दि. ३०.११.२०२४ रोजी माझ्या विहीरीवर विद्युत मोटार बसविली त्यावेळी माझी मुलगी माहेरी असलेने माझे सोबत होती. मोटार चालू करु नका म्हणून मुलगा गणपत पांडुरंग फुलमंटे यांनी अडविले व धक्का बुक्की करुन शिवीगाळ केली, त्यामुळे मी पोलीस स्टेशन अहमदपूर येथे आले, त्यावेळी मला विद्युत बिल व इतर कागदपत्र दया म्हणाले म्हणून माझी तक्रार घेतली नाही. त्यावेळी गणपत मला शिवीगाळ करत चल गावाकडे पंचासमक्ष बोलून तडजोड करुत म्हणाला, त्यावेळी मी गावाकडे गेले. तेथे मुलीला व मुलगा नवनाथ यांना सर्व प्रकार सांगितला व नवनाथ निघून गेला, त्यावेळी गणपत हा घरात आला व तुलाच खतम केल्यानंतर जमीन व विहीर मलाच मिळते म्हणून बळजबरीने माझे तोंडात विषारी औषध घातले, तेव्हा मुलीने आरडा ओरडा केला व मुलगा नवनाथ, गोपाळ शंकर वलसे व इतर लोकांनी मला सरकारी दवाखान्यात घेऊन गेले परंतु डॉक्टरांनी लातूरला पाठवले. तेथे उपचार घेवून मी सध्या ठिक आहे तरी मुलगा गणपत पांडुरंग फुलमंटे रा. थोरलेवाडी यांचेवर कायदेशीर व कडक कार्यवाही करावी ही विनंती असा तक्रार अर्ज सदरील पिडित महीलेने उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर यांना दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *