विभागीय सायकलींग स्पर्धा उत्साहात संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : दि O7 डिसेंबर 2024 रोजी अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अहमदपूर येथे विभागीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन क्रीडा कार्यालय लातूर व लातूर जिल्हा सायकलींग असो. लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते विभागीय स्पर्धेसाठी नांदेड, उस्मानाबाद व लातूर येथील 120 खेळाडूंचा सहभाग होता.
यातून 24 खेळाडूंची राज्य स्तरीय शालेय सायकलींग स्पर्धेसाठी निवड झाली.
सदरील स्पर्धा क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, प्रा. शरद माने उपाध्यक्ष महाराष्ट्र सायकलींग असो. , शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री दत्ता गलाले, प्रशांत माने, यांच्या मार्गद्शनाखाली संपन्न झाल्या. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बंटी सोनसळे (नांदेड), भाऊराव कदम (NIS प्रशिक्षक), अक्षय कदम (NIS प्रशिक्षक), मिलिंद कांबळे, श्री. राजू डाखोरे व उपस्थितीत सर्व क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक यांनी परिश्रम घेतले.