आमदार बाबासाहेब पाटील यांचा वाढदिवस सुखमणी वृध्दाश्रमात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील सुखमणी वृध्दाश्रमात अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम वृध्दाश्रमातील आज्जी आजोबांच्या हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रमानंतर लागलीच तेथील आज्जी आजोबांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा आज्जी आजोबांनी आस्वाद घेतला व भरभरून शुभेच्छा व आशीर्वाद दिला. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या तालुकाध्यक्षा सुप्रीयाताई चंद्रशेखर भालेराव, नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, कमला नेहरू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दर्शना हेंगणे शिवानी कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.