श्यामार्य कन्या विद्यालयात फॅशन शो उत्साहात संपन्न

0
श्यामार्य कन्या विद्यालयात फॅशन शो उत्साहात संपन्न

श्यामार्य कन्या विद्यालयात फॅशन शो उत्साहात संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था संचलित श्यामलाल विज्ञान कला व क्रीडा अकॅडमी प्रस्तुत श्याम कला पंधरवडा अंतर्गत श्यामलाल प्राथमिक विद्यालय आणि श्यामार्य कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी फॅशन शोचे आयोजन करण्यात आलेले होते. या फॅशन शोचे अध्यक्ष श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणि आर्य होते. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेले हॉटमोंड मिसेस इंडिया वर्ल्ड वाईड 2019 वर्षातील फायनलिस्ट असलेले मिसेस अश्विनी सुडे – भंडारे कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
संस्थेच्या सहसचिव अंजुमनी आर्य, श्रीमती चटनाळे व ॲड. रमाकांत चटनाळे , श्यामलाल विज्ञान कला व क्रीडा अकॅडमीचे संयोजक सेवानिवृत्त मुख्याध्यापक बालाजी चव्हाण, श्यामार्य कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्रवीण भोळे, श्यामलाल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत खंदारे, श्यामलाल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक उगिले, पर्यवेक्षक राहुल लिमये, श्यामार्य कन्या विद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक विजय बैले आदी मान्यवर उपस्थित होते.
श्यामलाल प्राथमिक विद्यालय आणि श्यामार्य कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 300 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवलेला होता. कार्यक्रमाप्रसंगी खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
फॅशन मॉडेलसाठी इच्छित शरीर आणि एकूण आरोग्य प्राप्त करण्यासाठी संतुलित आहार आणि एक प्रभावी व्यायाम योजना राखणे महत्वाचे आहे. मिस इंडिया स्पर्धा हे मुलींमधील सौंदर्य आणि प्रतिभा दाखवण्यासाठी एक व्यासपीठ आहे. आजच्या जगात, प्रत्येक मुलगी तिचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि कायमचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करते. मिस इंडिया ऑडिशन तरुण आणि हुशार मुलींना त्यांचे कौशल्य राष्ट्रीय प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करण्याची सुवर्ण संधी प्रदान करते. मिस इंडिया बनणे हे एक स्वप्न आहे, जे अनेक तरुणी पूर्ण करू इच्छितात. हे एक व्यासपीठ आहे. जिथे सौंदर्य, बुद्धिमत्तेला भेटते आणि प्रतिभा चमकते.मिस इंडिया होण्यासाठी, तुमचे नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यावर आणि स्वतःला परिपूर्ण बनवण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.निरोगी शरीरासाठी संतुलित आहार, फळे, भाज्या, प्रथिने आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असलेल्या संतुलित आणि पौष्टिक आहाराचे पालन करा. निरोगी आहारामुळे तुमच्या शरीराचे पोषण तर होतेच पण सोबतच चमकदार त्वचा आणि केस चमकदार बनतात. तुमचे शारीरिक मोजमाप काहीही असो, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. तुमचा अद्वितीय शरीर आकार स्वीकारा आणि आत्म-आश्वासन पसरवा. लक्षात ठेवा, सौंदर्य केवळ शारीरिक गुणधर्मांवर अवलंबून नसते. मिस इंडिया होण्यासाठी पारंपारिक परिधान फेरी,इव्हनिंग गाऊन राउंड,टॅलेंट राऊंड,प्रश्न-उत्तर फेरीच्या माध्यमातून आपली अंतिम निवड करण्यात येते, असे मिसेस अश्विनी सुडे भंडारे यांनी मनोगतातून आपले मत व्यक्त केले. आणि मिस इंडिया होण्याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली.

     श्यामार्य कन्या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय व जागतिक पातळीवर प्रत्येक क्षेत्रात स्थान प्राप्त होण्यासाठी बालवाडी पासून ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना या कला पंधरवड्या अंतर्गत त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी श्यामलाल कला क्रीडा व विज्ञान अकॅडमी अंतर्गत व्यासपीठ मिळवून दिले जाते.

जागतिक स्तरावर होणाऱ्या फॅशन शोच्या स्पर्धेची पूर्वतयारी विद्यार्थ्यांच्या बालपणातच घेतल्याने भविष्यातील सर्व स्पर्धेसाठी ते सज्ज राहू शकतात. असे अध्यक्षीय समारोपप्रसंगी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. आर्य यांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन श्रीहरी निडवंचे तर फॅशन शोचे सूत्रसंचालन विजयकुमार बैले, माधव कांबळे आणि अंतेश्वर बिरादार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्यामार्य कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्रवीण भोळे यांनी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *