स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी उदगीर भाजपाच्या वतीने अभिवादन
उदगीर (एल.पी.उगीले) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत केंद्रीय मंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त उदगीर येथील शहर भाजपाच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, राजू उर्फ राजकुमार मुक्कावार, ऍड. दत्ताजी पाटील, आनंद बुंदे, रामेश्वर पवार, गणेश गायकवाड, रामेश्वर चांडेश्वरे, रमेश धावडे, संजय पाटील, मारोती कोटलवार, सुजित जीवने, व्यंकट काकरे, पिंटू श्रीनेवार, शिवगंगा बिरादार, शिवकर्णा अंधारे, यशवंत बारस्कर, सुनील गुडमेवार, अनिल मुदाळे, श्रीकांत पांढरे, संजय पाटील, संतोष बडगे, रवींद्र बेद्रे, विजय मामुलवार, प्रसाद पांढरे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.