भाऊसाहेब दूरदृष्टीचे समाजसेवक होते – प्राचार्य डॉ.हेमंत देशमुख

0
भाऊसाहेब दूरदृष्टीचे समाजसेवक होते - प्राचार्य डॉ.हेमंत देशमुख

भाऊसाहेब दूरदृष्टीचे समाजसेवक होते - प्राचार्य डॉ.हेमंत देशमुख

उदगीर (एल.पी.उगीले) : विद्येसाठी जगण्याचा मोह तयार करण्याचे कार्य भाऊसाहेबांनी केले.विद्ये शिवाय जीवनामध्ये काहीच नाही हे भाऊसाहेबांनी जाणले होते.भाऊसाहेब हे दूरदृष्टीचे समाजसेवक होते असे उद्गार प्राचार्य डॉ.हेमंत देशमुख यांनी काढले. ते येथील शिवाजी महाविद्यालयामध्ये डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवन व कार्य या विषयावर १२५ व्या जयंतीनिमित्त यादव देशमुख कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय,तिवसा जिल्हा अमरावती व शिवाजी महाविद्यालय,उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे होते, तर प्रमुख उपस्थिती डॉ.प्रशांत हारमकर अर्थशास्त्र विभाग प्रमुख यादव महाविद्यालय तिवसा,प्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे, समन्वयक डॉ.विष्णू पवार यांची होती. पुढे बोलताना प्राचार्य देशमुख म्हणाले, त्या काळामध्ये शिक्षणाची सोय नव्हती, स्पृश्य, अस्पृश्य वाद होता. तो मिटवण्याचे कार्य भाऊसाहेबांनी केले. त्यांनी स्वतः अतिशय परिश्रमातून पीएचडी पदवी प्राप्त केली, आणि समाज उद्धारासाठी, लोकोद्धारासाठी आपले जीवन कार्य अर्पण केले.त्यांनी केलेले कार्य नवीन पिढीपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम व्याख्यान मालातून केले जात आहे असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.मांजरे म्हणाले, भाऊसाहेब थोर समाज सुधारक होते. शिक्षणाची क्रांती त्यांनी केली.ग्रामीण भागातील जनतेचा विकास केला. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना मार्ग मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. डॉ.विष्णू पवार, प्रास्ताविक डॉ.प्रशांत हरमकर तर आभार प्रा.बालाजी सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला प्राध्यापक,कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *