शास्त्री प्राथमिक शाळेत गीता जयंती उत्साहात साजरी
उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयमध्ये, मार्गशीर्ष शुक्ल मोक्षदा एकादशी हा भागवत गीतेच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर,प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारक कौशलजी महामुनी,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते.
प्रमुख अतिथी व व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून राजमाता अहिल्यादेवी होळकर व श्रीमद् भगवद्गीता ग्रंथास वंदन करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविकामध्ये ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी गीतेचा संस्कार मनावर झाल्यावर राष्ट्रभक्त पिढी तयार होईल,तसेच जागतिक स्तरावर गीता जयंती साजरी करण्यात येते.भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनातील संभ्रम गीतेच्या माध्यमातून दूर केला.असे सांगितले.
भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायाचे सामुहिक पठण विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले.इयत्ता तिसरी ते चौथीच्या एकूण ४७५ विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात एकाच वेळी गीतेचा पंधरावा अध्याय म्हणून उपस्थितांची मने जिंकली.
प्रमुख पाहुणे कौशलजी महामुनी यांनी गीतेचे महत्व सांगून,आपल्या संस्कार केंद्रातील विद्यार्थी हे संस्कारक्षम आहेत,असे कौतुक केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी गीता हा आपल्या आयुष्याचा सार आहे. गीतेमुळे आपण कसे जगावे, हे गीतेने सांगितले आहे. आपण गीतेबरोबर इतर ग्रंथ ही वाचावे,असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती भाग्यश्री स्वामी बाई यांनी केले.कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली.