पळवून नेलेल्या अल्पवयीन पीडित मुलींचा पुणे येथून शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश
लातूर (एल.पी.उगीले) : 14 वर्षीय एका अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळउन नेले बाबत औसा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होती.मागील 6 महिन्या पासुन पोलीस स्टेशन कडून संबंधित पीडित मुलींचा शोध सुरू होता.
पोलीस स्टेशनला दाखल तक्रारीबाबत पोलीस स्टेशन सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथक कडून समांतर तपास करण्यात येत होता.
गुप्त व तांत्रिक माहिती संकलन व विश्लेषणाचे आधारे या विशेष पथकाच्या टीमने अल्पवयीन मुलींचा पुणे येथे शोध घेण्यात यश आले.
पथकाने 1 दिवस शहरात मुक्काम करून 1 अल्पवयीन पीडित मुलगी व तिचे सोबत 1 आरोपीला ताब्यात घेतले. मिळून आलेली पीडित मुलगी व आरोपीस संबंधित पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.
सद्या लातूर जिल्हा पोलीस दल व विशेष पथकाने ऑपरेशन मुस्कान शोध मोहीम राबवत असुन त्या दरम्यान लातूर जिल्ह्यातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेण्याची महत्त्वाची कामगिरी पार पाडली जात आहे.
सदरची कामगिरी सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक, लातूर व अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती बबित वाकडकर, पोलीस निरीक्षक, श्रीमती श्यामल देशमुख, सुभाष सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अमलदार , सदानंद योगी, प्रकाश जाधव, महिला अंमलदार सुधामती यादव व लता गिरी, चालक निहाल मणियार यांच्या पथकाने पार पाडली आहे.