हुतात्मा भाई श्यामलालजी आर्य यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन व शैक्षणिक शोभायात्रा संपन्न!
उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामातील अग्रणी हुतात्मा विद्यामित्र श्यामलालजी आर्य यांचा 17 डिसेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य यांच्या हस्ते संपन्न झाले. ध्वजारोहण कार्यक्रम व श्याम स्मृतिदिनानिमित्तची रॅली उदगीरच्या लढाईस समर्पित करण्यात आली, शैक्षणिक शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी संस्था पदाधिकारी अध्यक्ष ऍड सुपोषपाणि आर्य, सचिव ऍड. विक्रम संकाये, सहसचिव अंजुमणिताई आर्य, शालेय समिती सदस्य पंडितराव सुकनिकर, संस्था सदस्य पी. जी. पाटील, अभंगराव कोयले, दिपा बाहेती, भागवतराव घोळवे, मोहनराव निडवंचे, रामभाऊ मोतीपवळे, रवी हसरगुंडे, एस. एम. बिरादार, पटणे , टेकुळे , प्रा. नारखेडे , सुबोध आंबेसंगे, बालाजी चव्हाण, उषा तोंडचिरकर, ओमप्रकाश गर्जे, सर्व आस्थापना प्रमुख इत्यादी मान्यवर या शैक्षणिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या रॅलीमध्ये उपस्थित होते.
इस वी सन 1760 मध्ये उदगीरच्या लढाईमध्ये सदाशिवराव भाऊ पेशवे व निजाम यांच्यात लढाई झाली, यात मराठा साम्राज्याचे सरसेनापती सदाशिवरावभाऊ पेशवे यांचा विजय झाला होता. सदाशिवराव पेशवे यांनी उदगीरचा भुईकोट किल्ला आपल्या ताब्यात घेतला, पुढे पानिपतच्या लढाईसाठी आगेकूच केली. इतिहासातील हा प्रसंग उदगीरच्या भूमीमध्ये घडला होता. इतिहासातील या स्मृती जाग्या करण्यासाठी हुतात्मा भाई श्यामलाल जी आर्य यांच्या स्मृतिदिनी दिनानिमित्त सुपोषपाणि आर्य यांच्या संकल्पनेतून इतिहासात प्रसिद्ध असलेल्या उदगीरच्या भुईकोट किल्ल्यावर विद्यार्थ्यांची शैक्षणिक व ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात आली. सर्व आस्थापनातील विद्यार्थ्यांनी मावळ्यांच्या वेशभूषेत, तत्कालीन महाराष्ट्रीयन वेशभूषेत येऊन भरभरून प्रतिसाद दिला. रॅली मार्गस्थ होत असताना मराठवाडा मुक्ती लढ्यामध्ये आपले संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या हुतात्मा भाई श्यामलाल जी आर्य यांना सर्वांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. उदगीर शहरातील चौका चौकामध्ये असलेल्या हुतात्मा स्मारकांना, महापुरुषांना संस्था पदाधिकारी व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. शैक्षणिक शोभायात्रा आनंददायी वातावरणात संपन्न झाली.