जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवी यश
उदगीर (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय सब जुनिअर स्पर्धा लातूर येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल लातूर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदविला .त्यामध्ये गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता . व अकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत असे यश प्राप्त केले आहे. इंडियन राउंड मुलांमध्ये मध्ये शिवम झेंडे -प्रथम ,समर्थ भेदे – द्वितीय, हर्षवर्धन पवार -तृतीय, गोकुळ बिरादार -पाचवा, ऋतुराज जाधव – सहावा. तसेच इंडियन राउंड मुलींमध्ये जानवी पवार -प्रथम,मारियानाज पठाण- द्वितीय, रिकर्व राऊंड मुली वैष्णवी पवार -प्रथम ,भारती पवार -द्वितीय, कंपाउंड राउंड मुली शिवानी झेंडे -प्रथम अशाप्रकारे खेळाडूंनी यश प्राप्त केले आहे. या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . राज्यस्तरीय स्पर्धा 21 ते 23 डिसेंबर या कालावधीत नाशिक येथे पार पडणार आहेत.
या खेळाडूंना गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक सुधीर पाटील, सुषमा पवार, मारोती बिरादार यांचे मार्गदर्शन लाभले, यशस्वी खेळाडूंना लातूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे ,सचिव अशोक जंगमे,प्रवीण गडदे ,राजेश देवकर क्रीडा प्रेमी भास्कर पाटील, गजानन पवार, अभिजीत नळगिरकर, मनोहर पवार, संदीप देशमुख, यमुनाजी भुजबळे, उमाकांत भेदे यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.