उदगीर नगरपरिषद अंतर्गत स्वनिधी भी-स्वाभिमान भी शिबीर संपन्न

0
उदगीर नगरपरिषद अंतर्गत स्वनिधी भी-स्वाभिमान भी शिबीर संपन्न

उदगीर नगरपरिषद अंतर्गत स्वनिधी भी-स्वाभिमान भी शिबीर संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : बँक ऑफ बडोदा यांच्या सहकार्याने उदगीर नगर परिषदेच्या वतीने स्वनिधी भी, स्वाभिमान भी शिबिर संपन्न झाले.
राज्यातील लॉकडाऊन कालावधीत मोडकळीस आलेल्या पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवल याचा तातडीने पतपुरवठा प्रदान करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेची राज्यात प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याच्या हेतूने पथविक्रेत्यांना सूक्ष्म पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर योजने अंतर्गत तीन टप्प्यात दहा, वीस, पन्नास हजार खेळते भांडवली कर्ज उपलब्ध केले जात आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दि.१ ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत स्वनिधी भी, स्वाभिमान भी हा पंधरवडा आयोजीत करण्यात आला होता.
त्यानुसार ज्या लाभार्थ्यांचे बँकेत कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा लाभार्थीची कर्ज प्रकरणे निकाली काढणे, तसेच सदर योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थींना पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम जनधन योजना, पीएम जीवन ज्योती योजना अंतर्गत नोंदणीकरण, पीएम श्रमयोगी मानधन योजना, वन नेशन वन-राशन कार्ड, जननी सुरक्षा योजना, पीएम मातृवंदना योजना या आठ योजनांचा लाभ देण्यासाठी मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरवडा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिर बँक ऑफ बडोदा शाखा उदगीर यांच्या सहकार्याने शहरातील पथविक्रेते यांना प्रथम टप्पा दहा हजार प्रमाणे चौघांना तर , द्वितीय टप्पा वीस हजार रुपये बारा जणांना, तर तृत्तीय टप्पा पन्नास हजार रुपये तिघांना देण्यात आले. असे एकूण १९ लाभार्थीना चार लाख तीस हजार रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमास बँक ऑफ बडोदा शाखा उदगीर चे व्यवस्थापक प्रमोद मारापल्ले, फिल्ड ऑफिसर सुरज ठाकूर, सहाय्यक व्यवस्थापक जितेश जाधव, आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते लाभार्थींना धनादेशाचे वितरण करण्यात आले व उपरोक्त सर्व योजनाची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर अभियान व्यवस्थापक विशाल गुडसूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँक सहाय्यक संतोष गिरी यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *