उदयगिरीत सुमित कोकरे याचा राज्य क्रिकेट संघात निवडीबद्दल सत्कार
उदगीर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी सुमित सुरेश कोकरे याची राज्यस्तरीय क्रिकेट संघात निवड होऊन तो राष्ट्रीय स्पर्धेत जाणार आहे. याबद्दल या खेळाडूचा त्याच्या वडीलासह महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव ॲड.एस.टी.पाटील चिघळीकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे येथे त्याची निवड झाली. त्यास क्रीडासंचालक एस.बी.मुंढे आणि प्रा.रोहन येनाडले यांचे मार्गदर्शन लाभले होते. यावेळी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य एस. जी. कोडचे यांची उपस्थिती होती.