कुमठा येथे 150 रुग्णांची मोफत तपासणी
उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुमठा (खु.) येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्त तपासणी शिबिरात 150 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून रक्तदान शिबिरात 61 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष माजी आ. गोविंद केंद्रे होते.यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, तालुकाध्यक्ष शिवशंकर धुपे, डॉ. प्रशांत चोले (हृदयरोग तज्ञ), डॉ. प्रशांत नवटके (मधुमेह तज्ञ) उपस्थित होते.
या शिबिराचे समन्वयक सतीश केंद्रे, संभाजी फड, माधव भुसारे, शिवाजी केंद्रे,दिनकर केंद्रे, रामकिशन रणक्षेत्रे, राम ममुले, प्रकाश बिरादार आदी उपस्थित होते.