मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी शुभंम पांचाळ, सचिवपदी मन्मथ भुसागरे यांची निवड
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थीची उदगीर येथे बैठक घेऊन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी शुभंम पांचाळ तर सचिवपदी मन्मथ भुसागरे यांची निवड करण्यात आली आहे.
तर उर्वरित कार्यकरणीत उपाध्यक्ष म्हणून तौफीक सत्तार पठाण, बुद्धरत्न संजीव भुताळे, सहसचिव शुभंम मुसने, प्रदीप सोनकांबळे, कोषध्यक्ष नरेंद्र पिचारे, भैय्यासाहेब मसुरे, सल्लागार पठाण आसिफ, रोहित कांबळे, संघटक अविनाश बिरादार, संदीप हल्लाळे, मार्गदर्शक सचिन झुमकुलवाड, विशाल रोडेवाड, सदस्य म्हणून नंदकुमार मुसने, साक्षी एकलिंगे, अनिता लोहारे, संग्राम बुडगे, शरद कांबळे, सुवर्णा देवनाळे, आशा कुंडगीर यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी उदगीर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सर्व सहायक व ईतर विभागातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.