गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते गुणवंत उदयगिरी अकॅडमीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
उदगीर (प्रतिनिधी) : येथील नामांकीत उदयगिरी अकॅडमीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अत्यंत उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे शालेय प्रथम सत्र परीक्षेत ९५% पेक्षा अधिक गुण घेणार्या विद्यार्थ्यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. दिनदर्शिका विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी वस्तू असते. ही दिनदर्शिका सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक अशा सर्व माहितीने परिपूर्ण आहे. सदरील कार्यक्रमात उदयगिरी अॅकॅडमीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व विद्यार्थ्यांना दिनदर्शिका वाटप करण्यात आल्या.
दिनदर्शिकेचे प्रकाशन हा उदयगिरी अॅकॅडमीचा वार्षिक उत्सव आहे, आणि तो प्रत्येक वर्षी तेवढ्याच थाटामाटात संपन्न होतो. विद्यार्थ्यामध्ये वार्षिक अभ्यासाचे नियोजन लावण्याची सवय व वक्तशीरपणा या सवयी रूजाव्यात आणि उदयगिरी अॅकॅडमीच्या वतीने सर्व पालकांना एक छोटीशी वार्षिक भेट घरपोच मिळावी हे या उपक्रमामागचे उद्देश आहेत असे मत उदयगिरी अॅकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांनी यावेळी प्रस्तावनेत बोलत असताना व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रा.संतोष पाटील , प्रा.धनंजय पाटील , प्रा.श्रीगण वंगवाड , प्रा.सौ. ज्योती खिंडे, सौ.मीना हुरदाळे ,प्रा. सौ.नंदिनी निटूरे , प्रा.सौ.निवेदिता भंडारे इ. उपस्थित होते. प्रकाशन सोहळा यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी परिश्रम घेतले.