20 फुट खोल शेत तळ्यातील अति विषारी घोनस सापाला दिले सर्प मित्राने जिवदान
अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील अंधोरी येथील एका शेतकऱ्याच्या शेततळ्यात अति विषारी घोनस जातीचा साप पाण्यात पडला होता त्या सापाला सर्प मित्राने बाहेर काढून जिवदान दिले आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अंधोरी ता अहमदपुर येथील घटना 20 फुट खोल व 100 फुट लांबी रूंदी असलेले शेततळे शेतकरी प्रल्हाद शंकर शिंगाडे यांच्या शेततळ्यात गेले चार पाच दिवसापासुन मोठालठ्ठ परड जातीचा साप पाण्यात पडल्याचे दिसुन आले सध्या खुप थंडीचे वातावरन असल्याने मानसाचे स्वेटर जरकिंग घालुन सुध्दा येवढे हाल होत आहेत, तरी प्रान्यांचे काय त्याचा कोन विचार करावा येवढ्या थंडिच्या वातावरनात पाच दिवसापासुन साप पान्यात पडल्याची माहीती सर्पमित्र प्राणिमित्र मगर स्पेशालिस्ट सिध्दार्थ काळे व कान्हा पांचाळ यांना सायंकाळी 10 च्या सुमारास मिळाली,सर्पमित्र काळे व पांचाळ हे सकाळी 6 वाजता घटनास्थळी आपल्या दुचाकिवर थंडिमध्ये सापाचा जिव वाचवन्यासाठी धाव घेतले, व तेथे जाऊन पहानी केली असता क्षनाचाही विलंब न लावता त्या सापाला ताबडतोब बाहेर काडुन त्याला थोडी गरमिची उब दिली,साप थंड रग्ताचा प्राणि असल्यामुळे सापाला जास्त थंडी सहन होत नाही, जास्त थंडी पडल्यास साप गरमिची उब घेन्यासाठी दगडाविटाचे ढिग घराशेजारी येऊ शकतो म्हनुन काळजी घ्यावी, घोनस सापाविषई सविस्तर माहिती अशी की सापाचे मराठी नाव घोनस (परड) इंग्रजी नाव रसेल्स वायपर अशे म्हनतात सध्या त्याचा मिलनकाळ आहे म्हनुन साप जोडिने राहु शकतो मे जुलै दरम्यान घोनस सापाची मादी 6 ते 63 पिलांना जन्म देते तरी आपल्या परीसरात साप किंवा कुठलाही जखमी प्राणि पक्षी अथवा मगर बिबट्या आढळल्यास सर्पमित्र सिध्दार्थ काळे व कान्हा पांचाळ किंवा तालुक्यातिल वनविभागाशी संपर्क साधावा मोनं 9623729438
