विद्यार्थ्यांसाठीमराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धा – २०२४
अहमदपूर ( गोविंद काळे ) : स्व.दत्तात्रय हेलसकर यांनी १९९४ मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलसच्या वतीने पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त हेलस कथामाला शाखा जालना आणि मानस फाऊंडेशनच्या सहकार्याने मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी या स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे स्वरूप, नियम व अटी…
प्रवेश फी नाही.
स्पर्धा मराठवाड्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे.
स्पर्धा दोन गटात आहेत.
- बालगट : इयत्ता पाचवी ते सातवी
- किशोर गट : इयत्ता आठवी ते दहावी
कथाकथनासाठी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील संस्कारक्षम, बोधप्रद कथेची निवड करणे आवश्यक आहे.
कथा आठ ते दहा मिनिटांची असावी.
पारितोषिके व सन्मान
जिल्हास्तर :प्रथम , व्दितीय व तृतीय पारितोषिक : प्रमाणपत्र व ग्रंथ भेट
विभागीय स्तर पारितोषिक :
बालगट व किशोर या दोन्ही गटातील विभागस्तरीय विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येईल.
1.प्रथम : रोख दीड हजार रुपये
2.द्वितीय : रोख एक हजार रुपये
3.तृतीय : पाचशे रुपये
उत्तेजनार्थ पारितोषिका सह
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक 21डिसेंबर २०२४, शनिवार सकाळी 11वाजता स्थळ
यशवंत विद्यालय, अहमदपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर
या स्पर्धेत सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन मुख्य संयोजक तथा अध्यक्ष
श्रीमती कल्पना दत्तात्रय हेलसकर 9420036935, लातूर जिल्हा संयोजक राम तत्तापुरे 9764330300, सहसंयोजक प्राचार्य चंद्रशेखर कळसे 9764744602 यांनी केले आहे.
- किशोर गट : इयत्ता आठवी ते दहावी