मराठवाडा साहित्य परिषदेच्या सदस्यांचा सत्कार संपन्न
अहमदपूर ( गोविंद काळे ) : मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरच्या निमंत्रित सदस्यपदी येथील एल आय सी चे विकास अधिकारी मोहिब कादरी आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रामीण शब्दकोशाच्या निमंत्रित सदस्यपदी सेवानिवृत्त प्राध्यापक द मा माने यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अहमदपूर मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने महेंद्र खंडागळे यांच्या निवासस्थानी म सा प चे कार्यवाह हरिदास तम्मेवार, उपाध्यक्ष उदयकुमार जोशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी कोषाध्यक्ष महेंद्र खंडागळे, प्राचार्य नीळकंठ पाटील, प्राचार्य दिलीप मुगळे, राम तत्तापुरे, गंगाधर याचवाड,अनिल फुलारी यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन जिलानी शेख यांनी तर आभार राम तत्तापरे यांनी मानले.