अहमदपूर ( गोविंद काळे ) मुलांचा सर्वांगीण विकास प्राथमिक स्तरावरील शिक्षणामध्ये होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी शाळेत होणाऱ्या बाल सभेच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा त्यातूनच खरे बाल कलाकार घडतात असे आग्रही प्रतिपादन पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी केले.
ते यशवंत विद्यालयात वर्ग सहावीच्या वतीने आयोजित बाल सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
बाल सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, व्यासपीठावर सह शिक्षक बालाजी सोनटक्के, सह शिक्षक श्रीधर लोहारे, विजयाताई स्वामी, सविता झोळगीकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी चिमुकल्या राजनंदनी बनसोडे, आराध्या पाटील, नंदनी नागरगोजे, अहिरीश सय्यद, संध्या कोम्पले या विद्यार्थ्यांनी विविध समाज सुधारकांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे झाले. बाल सभेचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य गजानन शिंदे यांच्या भाषणाने करण्यात आला.
बाल सभेचा शुभारंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.
विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी म्हणून ग्रंथ प्रदर्शन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर लोहारे यांनी सूत्रसंचालन सुरभी मुसळे, भक्ती बिराजदार, मानसी गुंडेवाड यांनी तर आभार राधिका डुकरे यांनी मांनले.
बालसभा यशस्वी करण्यासाठी वर्ग सहावीच्या ज्ञानेश्वरी सूर्यवंशी, वैभवी मोरे, समृद्धी गुणाले, प्रतिनिधी सानवी सुडे, मॉनिटर विशाखा प्रिया उगिले आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.