शिक्षकांनी स्वतःच्या विषयाचे ग्रंथालय निर्माण करून प्रभावी अध्यापन करावेशिवशंकर राऊत यांचे प्रतिपादन
अहमदपूर ( गोविंद काळे ) बदलत्या युगा सोबत शिक्षकांनी ही अपटेड असलं पाहिजे.आव्हानात्मक विद्यार्थी घडवण्यासाठी स्वतःच्या विषयाचे ग्रंथालय निर्माण करून प्रभावी अध्यापन करावे असे प्रतिपादन गणित विषयाचे अभ्यासक तथा लेखक शिवशंकर राऊत यांनी केले.
ते अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात आयोजित कार्यशाळेत उपस्थित सर्व शिक्षकांना गणित विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र देवणीकर,मीना तोवर,सुरेश वट्टमवार, प्रा. कल्याण होनराव सह सर्व शिक्षक उपस्थित होते.
पुढे बोलताना शिवशंकर राऊत म्हणाले की,स्पर्धा परीक्षेतील गणिताच्या प्रश्नांची रचना, प्रश्नपत्रिके चे बदलत जाणारे स्वरूप, काठीण्य पातळी, मूलभूत संकल्पना, विषयाचे संदर्भ ग्रंथ, प्रश्नपत्रिका,परीक्षेचे पूर्व नियोजन आणि अंमलबजावणी याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
तसेच इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम प्रयत्न करावेत.द बेस्ट परफॉर्मन्स देऊन सर्वोत्तम करिअर घडवावे असे आवाहन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनीही आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेचे महत्त्व आणि पालकांची भूमिका याचे महत्त्व विशद केले. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी व आभार शारदा तिरुके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.