इनरव्हील क्लब अहमदपूरचा स्तुत्य उपक्रम
अहमदपूर ( गोविंद काळे ) – लिंगधाळ अंगणवाडीला भेट देऊन अंगणवाडीतील बालकांसाठी युनिफॉर्म, स्कूल बॅग, टिफिन बॉक्स, पाण्याची बॉटल, खेळणी,पाण्याचे जार गर्भवती मातांसाठी औषध, गोळ्या सह पौष्टिक आहार तसेच तेथील निरक्षर महिलांना पाटी, पेन्सिलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा विजया भुसारे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून लिंगधाळच्या सरपंच बालिका गुरुमे, उपसरपंच कमलबाई यमले, ग्राम रोजगार सेवक धनेश्वर गुरुमे सह इनरव्हील क्लबच्या उपाध्यक्षा पूजा रेड्डी, सचिव रेखा बालुरे, सहसचिव कलावती भातांब्रे, आयएसओ सुनंदा पदातुरे, कोषाध्यक्षा सुरेखा उगिले सह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बालिका गुरमे यांनी सत्कार केला.
कलावती भातांब्रे यांनी आपल्या मनोगतात साक्षरतेचे महत्व सांगून निरोगी आरोग्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले.
विजया भुसारे -रोडगे यांनी अध्यक्षीय समारोप केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडी कार्यकर्ता मंगलबाई गुरमे, मदतनीस सुमनबाई वाघमारे, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा नागिमे यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामरोजगार सेवक धनेश्वर गुरमे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी लिंगधाळ मधील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.