बाबासाहेब पाटील मंत्री झाल्याचे कळताच शिरूर ताजबंद गावासह परिसरात जल्लोष
( फटाके फोडून जल्लोष – पेढे वाटून आनंद साजरा)
शिरूर ताजबंद ( गोविंद काळे) लातूर जिल्हयातील अहमदपूर मतदार संघाचे विकास पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार बाबासाहेब पाटील सलग दुसऱ्यांदा तीसरी टर्म आमदार झाल्याने मतदार संघात जनतेने उत्साहात स्वागत केले . छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जल्लोष केला .-तसेच रविवारी नागपूर येथे विधान भवनात झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात आमदार पाटील नामदार मंत्री म्हणुन शपथ घेताच शिरूर ताजबंद सह अहमदपूर मतदार संघातील गावोगाव फट्याक्याची आतिषबाजी कार्यकर्तांनी केली . पेढे वाटून आनंद साजरा केला . आमदार बाबासाहेब पाटील यांनी मागील काळात आघाडी सरकार व महायुतीच्या कार्यकाळात मतदार संघात विकासाची घोडदौड करीत रसत्यांचे जाळे विनले कोट्यावधी चा निधी मंजूर करुन खेचून आणला . तसेच शिरूर ये थे बसस्थानक मध्ये सिमेंट काँक्रिट तसेच नविन बसस्थानक इमारत बांधकाम मंजूरी मिळवली . गावात चार कोटी चा रस्ते साठी निधी मंजूर केला . तसेच अनेक योजनेसाठी निधीही मंजूर केला .शिरूर ताजबंद गावाने चार हजार मतांची आघाडी दिली त्यामुळे जनतेततून ठिक ठिकानी डिजिटल बॅनर लावून स्वागत केले . सरपंच मच्छिंद्र वाघमारे, उपसरपंच सुरज पाटील, ग्राम विकास अधिकारी प्रशांत घुगे,चेअरमन तुळशीराम भोसले, गोविंदराव सुर्यवंशी,इब्राहिम पठाण, महेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन कृउबा सभापती मंचकराव पाटील, उपाध्यक्ष बाबुराव सैदापुरे,सचिव आर .एन . वलसे, शाखा व्यवस्थापक मोहनराव खेडकर, मुख्याध्यापक दिपक भराटे. प्राचार्य डि.जी . माने, प्राचार्य निळकंठ पाटील, आशोकराव जाधव, गंगाधर ताडमे, नामदेव विराळे, शिवसांब स्वामी, नारायन सुर्यवंशी, माधव सरवदे, शिवराज पाटील, माधव तुपकर, आदींनी स्वागत करून आनंद साजरा केला .