आमदार बाबासाहेब पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ ; अहमदपूरात कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

0
आमदार बाबासाहेब पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ ; अहमदपूरात कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
आमदार बाबासाहेब पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ ; अहमदपूरात कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

अहमदपूर, ( गोविंद काळे): अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली व कार्यकर्त्यात एकच जल्लोष झाला.
बँड पथकाच्या वाद्यासह गुलाल उधळून, फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
कला शाखेचे पदवीधर असलेले आमदार बाबासाहेब पाटील यांना समाजसेवा, आधुनिक शेती, वाचन व योगासनाचा छंद आहे.

आमदार बाबासाहेब पाटील यांची राजकीय कारकीर्द 1985 साली शिरूर ताजबंद येथील सोसायटीत बिनविरोध निवडून येऊन झाली. बाबासाहेब पाटील यांनी द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई येथे प्राधिकृत अधिकारी म्हणून काम केले आहे. जिल्हा परिषद सदस्य पदी पंधरा वर्षे कार्य करत असताना पाच वर्षांसाठी त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सलग पाच वेळा संचालक पदी तर याच कालावधीत त्यांनी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम सांभाळले आहे.

शैक्षणिक काम

बाबासाहेब पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले असून बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ व शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवपदी काम पाहतात. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात त्यांनी संचालक म्हणूनही काम केले आहे.

सहकार क्षेत्र

सहकार क्षेत्रात त्यांनी महेश अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे ज्येष्ठ संचालक म्हणून ते काम पाहत असून महेश नागरिक पतसंस्था माध्यमातून ते अप्रत्यक्ष काम पाहतात.

काकांचे मोलांचे श्रेय.

बाबासाहेब पाटील यांची लहानपणापासून त्यांचे काका माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव त्यांच्या सहवासात त्यांची वाढ झाली आहे. बाबासाहेब पाटील यांचा घरातून राजकीय वारसा असून तीन वेळा आमदार व एक वेळा राज्यमंत्री पदी काम केलेल्या बाळासाहेब जाधव यांनी बाबासाहेब पाटील यांना लहानपणापासून राजकारणाचे धडे शिकवले आहेत.

तीन वेळेस मतदार संघाचे प्रतिनिधित्व.
—-,

2009 ते 14, सन 2019 चे 24 त्या कालावधीत त्यांनी यापूर्वी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले असून 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही बाबासाहेब पाटील यांनी निवडणूक एक हाती करत बत्तीस हजार मताधिक्याने विजय मिळवला होता.

मतदारसंघात भविष्यातील प्राधान्याने करावयाची कामे.

विधानसभा मतदारसंघात केलेला विकास हा मुद्दा घेऊन निवडणूक लढवलेल्या बाबासाहेब पाटील यांचे भविष्यात मतदारसंघातील शैक्षणिक दर्जा सुधारणे व सिंचन वाढवण्यासाठी अंतेश्वर प्रकल्प पूर्णत्वाकडे घेऊन जाणे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *