सी-डॅक कंप्युटर्सला बेस्ट परफॉर्मिंग सेंटरच्या अवॉर्ड ने सन्मानित केले
उदगीर (एल.पी.उगीले) : नुकत्याच लातुर येथे झालेल्या विभागीय मिटींग मध्ये लातूर जिल्हयामधुन MS-CIT कोर्सचे सर्वांत जास्त प्रवेश करणारे केंद्र व क्लिक, मॉम चे सर्वात जास्त प्रवेश करणारे केंद्र म्हणुन सी-डॅक कंप्युटर्स, उदगीरला 2 वेळा प्रमाण पत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आले आहे.
MS – CIT या कोर्स ला 24 वर्ष पूर्ण होऊन 1 कोटी 70 लाख विद्यार्थिनीचे MS – CIT चे शिक्षण पूर्ण करत 25 व्या वर्षात MS-CIT ने एक उज्वल अशी गरुड झेप घेतली आहे. संस्थाचालक प्रा सतीश उस्तुरे यांनी मागील 24 वर्षात घेतलेली खडतर मेहनत आणि जेव्हा संगणक शिक्षणाकडे फारसे लोक आकर्षित होत नव्हते त्या काळात या शिक्षणाचे आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देऊन केलेली शैक्षणिक क्रांती निश्चितच उल्लेखनीय आहे. PACE हि एक CDAC ची कॉम्पुटर चे ट्रेनिंग सेंटर देणारी संस्था, या संस्थेने उदगीर येथे मातृभूमी शिक्षण संस्थेला 1997 ला CDAC चे कोर्र्सेस चालवण्याची परवानगी दिली. त्या नंतर PACE नेच या संस्थेला MS-CIT कोर्स चालवण्याची परवानगी दिली. भरपूर आश्या उतार चढाव बरोबर मातृभूमी संस्था आज पर्यंत उदगीर, देवणी व जळकोट येथील विद्यार्थी व पालकांना विश्वासात घेऊन उत्कृष्ट कार्य केले. या परिसरातील विद्यार्थी व पालकांनी ठेवलेल्या विश्वासाला पूर्ण पणे समर्पित असे कॉम्पुटर चे प्रशिक्षण देऊन स्वतःला शिद्ध करण्याचा प्रयत्न या संस्थेने केला आहे. भविष्यात देखील या संस्थेकडून या पंचक्रोशीतील जनतेला फार मोठ्या आशा आहेत.
या कार्यक्रमाला एमकेसीएलच्या कार्यकारी संचालिका विना कामत मॅडम व मराठवाडा पुर्व विभागाचे विभागीय समन्वयक तथा मातृभूमी महाविद्यालयाचे मार्गदर्शन महेश पत्रिके , सिनीअर जनरल मॅनेजर अतुल पतौडी , अमित रानडे , जनरल मॅनेजर नटराज कटकदौंड , लातूर जिल्हयाचे जिल्हा समन्वयक अलोक मालु यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
या उज्वल यशाच्या संदर्भात बोलताना सतीश ऊस्तुरे यांनी स्पष्ट केले की, सी-डॅक कंप्युटर्स च्या या यशात आपणा सर्वांबरोबर माझे सहकारी दयानंद टाके , विवेक देवर्षे , निखत चाऊस मॅडम, संगीत दुन्डे मॅडम, राजनंदिनी कांबळे मॅडम, प्रकाश गायकवाड , श्रीरंग बिरादार या सर्वांच्या मेहनतीने हे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे उदगीर पंचक्रोशीतील आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी दाखवलेला विश्वासही बळ देणारा ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.